कवी म्हटले की कविता लिहण्याचा मोह आवरला जात नाही...
म्हणून प्रथम एक कविता तुम्हा सर्वांना वाचण्यासाठी.. ✍👉🙏
आठवणीत तुझ्या
तुझ्या जुन्या आठवणीनी मन
माझ पुन्हा पुन्हा दाटतंय गं
आज पुन्हा एकदा मला
तुझ्या सोबत जगावंसं वाटतंय गं…
तुला डोळे भरून पाहणारे
आज नजरे आड झाले गं..
माज्या जवळ ठेवण्यासाठी त्यांना
मी काय काय नाही केले गं…
माझ्या डोळ्यात आलेलं पाणी
तुला पाहिल की पुन्हा पुन्हा आटतंय गं..
आज पुन्हा एकदा मला
तुझ्या सोबत जगावंसं वाटतंय गं…
तुझ्या छोट्या छोट्या कारणांनी
प्रितीत दुरावा हा वाढला..
माझ्या आणी तुझ्या आपुलकीचा अंश
कसा कुठे कसा दडला…
तुला भेटायच्या ओढीने मन हे
माझ त्यांना पुन्हा पुन्हा गाठतंय गं..
आज पुन्हा एकदा मला
तुझ्या सोबत जगावंसं वाटतंय गं…
संकलन / लेखक
कवी - अविनाश पवार (Avish)
मो, ८३९०८५००९१
रिपोर्ट की समस्या