मैं और मेरी तनहाई, अकसर ए बाते करते है,
अगर मैं ए होता, तो ए होता !
अगर मैं वो होता, तो वो होता !!
अगर मै कुछ भी नही होता, तो क्या होता !!!
मित्रांनो, मी चंद्रशेखर परशुराम सावंत, वय वर्षे 70.
बी.काॅम. झालो आहे, त्याला खुप वर्षे होऊन गेली. वेराॅन, रत्नागिरीला मॅनेजर होतो. रिटायर्ड झालो. माझा सुवर्णकाळ होता तो. खुप मान मिळाला, खुप आनंद मिळाला, खुप चांगली माणसं भेटली, सर्वांची खुप आठवण येते. खुप चांगले दिवस होते ते. विसरता येत नाही.
आज पण आनंदात आहे. खुश आहे. कॅरम, चेस खेळायला आवडते. चांगला खेळाडू आहे. बडोद्याला रहातो. कॅरम रमवानू, जुस पिववानु, मज्जानू लाईफ. काही छंद जोपासले होते. वाचनाची आवड आहे. लिहीण्याची आवड आहे.
खुप वर्षे काही लिहिले होते. पण ते प्रकाशित करु शकलो नाही.
प्रतिलीपी ऐप मिळाले, खुप आनंद झाला. लिहीलेले प्रकाशित करत आहे. प्रतिलीपीचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे. आमच्या सारख्या लेखकांना एक आधार मिळाला. कृपया माझे लेखन वाचल्या नंतर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी अनमान करु नका, तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
मायमाऊली प्रतिलीपीचे धन्यवाद.
चंद्रशेखर परशुराम सावंत